परंडा (जि. धाराशिव) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) यांच्या परंडा तालुकाध्यक्षपदी नालगाव (ता. परंडा) येथील ज्येष्ठ नेते श्री. किरणकुमार जनार्धन करळे यांची निवड आज करण्यात आली.निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मा. जीवनराव गोरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील (भैया) पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर, दादा शिंदे, अॅड. अमोल पाटील, बाळासाहेब चिकाळकर, गणेश ननवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.