शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवा ; महेदविया उर्दु शाळेत बक्षीस वितरण प्रसंगी मौलाना काझी यांनी सांगीतले

परंडा दि २१ ( प्रतिनिधी ) येथील महेदविया उर्दू प्रा शाळेत ईद ए मिलादुन्नबी निमित्त प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या पाच विद्यार्थिनींना हाजी सत्तार शेख, मौलाना जफर काजी, मौलाना सकलेन सौदागर, बिलाल मौलाना, रिजाय सिकलकर, इम्रान सौदागर, बाशाभाई शहाबर्फीवाले, मुस्ताक चौधरी मौलाना, जमील शेख यांच्या हस्ते रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमात बोलताना मौलाना जफर काजी म्हणाले की सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईलची फार आवड निर्माण होत चालली आहे . पाल्यांची बौद्धिक क्षमता वाढीसाठी त्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे असे मत व्यक्त केले . तर आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार घडवण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांबरोबर पालकांची देखील आहे असे मत मौलाना सौदागर यांनी व्यक्त केले .
महेदविया प्रा शाळेत दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र जीवनकार्य, आदर्श आचार-विचार, सत्य, संयम, दया व मानवतेच्या संदेशावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती . या स्पर्धेत शाळेतील २१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . स्पर्धेत प्रथम शेख अलीना शहाजान ( ७००० ) रुपये, दुतीय बहिरे हिबा गौसपाशा ( ५००० ) रुपये, तृतीय हन्नुरे जारा गाजीबक्ष ( ३००० ) रुपये, चौथी बागवान सबा वसीम ( १५०० ) रुपये, पाचवी शिकलकर सबा कलीम ( ११०० ) रुपये, रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात मोहम्मद पैगंबर यांचे चांगले विचार,संस्कार, आत्मसात करता यावा हा त्यामागचा हेतु आहे . या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता . स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी व त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी संस्थेचे सचिव अब्दुल मुजीब पटेल यांच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन पर गिफ्ट देण्यात आले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका सय्यद आसीयाबेगम मुस्ताक हुसेन, सहशिक्षक हरून शेरीकर, जमीर शेख, सादिक शेख, जागीरदार निहाल अहेमद . यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमात प्रास्ताविक जमीर शेख यांनी तर सूत्रसंचलन इलियास शेख यांनी केले .

error: Content is protected !!