क्रांती करिअर अकॅडमी येथे पत्रकारांच्या हस्ते श्रींची आरती

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील क्रांतीसंगर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांती करिअर अकॅडमी ही विद्यार्थ्यांना पोलीस भरती, आर्मी इतर सर्व भरती संदर्भात प्रशिक्षण देण्याचे काम करते या संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोकणे व फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ यांच्या विनंतीनुसार गणपती बाप्पा (श्रींची) आरती परंडा येथील पत्रकार बांधवांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प बालाजी महाराज बोराडे, ह भ प दत्तात्रय महाराज हुके व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक , सचिव तानाजी घोडके या मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.यादरम्यान ह भ प बालाजी महाराज बोराडे व ह भ प दत्तात्रय महाराज हुके यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी क्रांती करिअर अकॅडमीतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!