जवळा जि.प.गटात प्रचाराचा धुरूळा पथनाट्याचा प्रयोग गावोगाव.

परंडा दि . ३० : – जवळा (नि) जि.प . गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जि . प .अधिकृत उमेदवार नानासाहेब पवार , पं . स . जवळा गणाचे हनुमंत कातुरे , सिरसाव गणाच्या प्रतिक्षा मुके यांच्या प्रचाराचा धमाका सुरू आहे . प्रचारादरम्यान दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्य कर्तृत्वाचा गाजावाजा करत पथनाट्याद्वारे गावोगाव होत आहे . नानासाहेब पवार यांचे मोठे बंधू रामचंद्र पवार व त्यांची टीम गावागावात, वस्त्या वाड्यावर घरोघर भेटी घेऊन अहोरात्र परिश्रम घेत आहेत . राजकारणातील नवखा कोरी पाटी असल्याने मतदार आकर्षित होत असल्याचे चित्र आहे .

error: Content is protected !!