जागतिक दिव्यांग दिन : ‘त्यांच्या’ स्वप्नांना बळ देण्यासाठी, ‘त्यांना’ सक्षम आधार देण्यासाठी आपले सरकार सज्ज आहे!

मुबंई(प्रतिनिधी)दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण झाली आहे.. आपण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठीचे आर्थिक सहाय्य वाढवून ते ₹१५०० वरून ₹२५०० करण्यात आले आहे. ११ वी, १२ वी व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी राहणे, भोजन आणि शिक्षणाची सोय देणारी महत्त्वाची योजना अंतिम टप्प्यात आली आहे.

सर्वसमावेशक शिक्षणाला गती देण्यासाठी सचिव पातळीवरील विशेष समिती स्थापन केली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार राज्यस्तरीय दिव्यांग निधीसाठी २० कोटींचे भागभांडवल निश्चित करून विविध पुनर्वसन योजनांना बळ देण्यात येत आहे. मानसिक आजारातून सावरलेल्या व्यक्तींसाठी १६ पुनर्वसन गृहे उभारण्याचे कामही नागपूर, ठाणे आणि पुणे येथे सुरू आहे.

रोजगार व स्वयंरोजगारासाठी पर्यावरणपूरक वाहन मोफत उपलब्ध करुन देणे, स्वयंरोजगारासाठी दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत कर्ज वितरण, कौशल्य प्रशिक्षण आणि विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतील १% निधी दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी समर्पित करण्यात आला आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने आत्मविश्वासाने, स्वावलंबी बनून आणि सन्मानाने आयुष्य जगावे हा या सर्व प्रयत्नांचा मुख्य हेतू आहे.

error: Content is protected !!