परंडा : शहरातील कल्याणसागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परंडा यांच्या वतीने ग्राहक सेवा केंद्र या योजनेअंतर्गत शून्य रकमेवर बँक खाते उघडणे, डिजिटल व्यवहार, बचत, सुकन्या समृद्धी योजना याविषयीची माहिती परंडा शाखेचे व्यवस्थापक प्रमोद जनबंधू यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली व सर्व विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी आवाहन करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांनी बँकिंग व्यवहाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच
कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी विटकर, शेख हे बँक कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक अजित गव्हाणे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.