धाराशिव (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या सामाजिक सशक्तीकरणासाठी ठोस पाऊल उचलत एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात आता ₹१,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिव्यांगांना दरमहा ₹१,५०० इतके अनुदान मिळत होते. आता हे वाढवून ₹२,५०० प्रतिमाह करण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री महोदयांचे आभार म्हणून दिव्यांग बांधवांकडून आमदार राणा दादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेत त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचे कार्य सुरु आहे. हा निर्णय दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
यावेळी भाजपा दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.समाधान मते, उपाध्यक्ष श्री.विठ्ठल गायकवाड, श्री.राजू चव्हाण, श्रीमती गायत्री जाधव, श्री.सुधीर भातलवंडे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.