परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या विकसित भारत या धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यांना सेवा सुविधा उत्तम पुरविण्यात आलेल्या आहेत. परंतु परंडा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय नेहमी रुग्णांच्या सेवेसाठी रेफर रुग्णालय व सुविधाचाअभाव,डॉक्टरांचा अनुपस्थितीचा प्रभाव येथील दवाखान्यावर कायम राहिला आहे. त्यात या दवाखान्यामध्ये उपलब्ध असणारे कर्मचारी रुग्णांना उद्धट भाषेमध्ये बोलतात. रुग्णांची निट तपासणी न करता त्यांना भयभीत करतात.असा प्रकार परंडा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये घडत आहे. याबाबत अनेक वेळा सर्व सामान्य नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी बाजू मांडल्या परंतु या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना काही फरक पडलेला नाही. उलट नागरिकांना दम देताना दिसतात.
परंडा रुग्णालयामध्ये उत्तम एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, रक्त तपासणी, डोळे तपासणी ,प्राथमिक उपचार , गंभीर आजर या बाबत शासकीय सेवा आहेत परंतु या सर्व सेवा असून देखील वेळेवर मिळत नाहीत. यावर प्रशासनाने एक चागला अधिकारी नेमणूक करावी व तालुक्यातील आरोग्य सेवा लवकरात लवकर सुरळीत करून उत्तम सेवा पुरवण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.