परंडा नगर पालिकेत नगराध्यक्ष शिवसेनेचा होणार ; आ तानाजी सावंत माझ्या विरोधात उभे रहा सौदागर यांचे मा आ.ठाकूर यांना चॅलेंज.

परंडा (तानाजी घोडके ) परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष डॉ. जाकीर सौदागर यांनी जुन्या नेत्यांवर तसेच विरोधातील दोन माजी आमदारांवर थेट आणि जोरदार टीका केली आहे. विशेषतः त्यांनी माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव न घेता ‘मॅनेजमेंट’च्या राजकारणावर निशाणा साधला, तर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांना ‘स्थानिक’ हा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीत उभे राहण्याचे थेट ‘ओपन चॅलेंज’ दिले आहे.

नेत्यांनी कधीच काळजी घेतली नाही राष्ट्रवादीच्या जुन्या नेतृत्वावर हल्लाबोल करताना डॉ. सौदागर यांनी यावेळी बोलताना त्यांच्या जुन्या राजकीय प्रवासातील कटू अनुभव कथन केले. ते म्हणाले, ‘मी चार वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढलो, पण नेत्यांनी कधीच माझी काळजी घेतली नाही. याचे कारण म्हणजे ते विरोधकांना कायम मॅनेज असायचे. ‘ माझ्या विरोधात फायटर उमेदवार नसाला पाहिजे,’ असे ते म्हणायचे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक बैठका घेत विजयाचे गणित मांडायला लागलेत. पण त्यांचे गणित चुकत आहे आणि ते चुकण्याचे कारण ‘मतदार जनता’ आहे. परंड्यातील जनता, प्रत्येक जातीची माणसं आमच्या सोबत आहे दोन्ही माजी आमदार यांनी मला पाडण्यासाठी दुसरे उमेदवार शोधण्यापेक्षा एका माजी आमदाराचे नाव शहरातील यादीत आहे त्यांनी स्वतः माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असे जाहीर आव्हान सौदागर यांनी नाव न घेता ठाकूर यांना केले त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे

विधानसभेला देखील माझ्यासोबत विश्वासघात केला सद्या नगरपालिका निवदणुकीच्या तोंडावर परंडा शहरात सर्व राजकीय विरोधक एकवटले आहेत खर तर आम्ही महायुती म्हणुन एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार होतो पण समोरून आमच्याआधीच अमच्याविरोधत सगळे एकवटले आहेत पण आम्ही देखील परंडा शहरात एकला चलो रे म्हणत शिवसेना एकटी लढणार असल्याचे आ तानाजी सावंत यांनी जाहीर केले जकिर सौदागर यांनी विधानसभेला खूप मेहनत घेतली आता त्याची परत फेड मी करणार असून जकीर सौदागर यांच्या सह 20 नगरसेवक शिवसेना पक्षाचे विजयी होण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे विरोधकांचे डीपॉझिट जप्त झाले पाहिजे त्यासाठी एक दिलाने कामाला लागा असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

जाकीर सौदागर यांच्या घरासमोरील मैदानात नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्भूमीवर शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला सावंत यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा समाचार घेतला या बैठकीला माजी नगरसेवक साबेर सौदागर, उद्योजक राजाभाऊ शेळके, वाजिद दखनी, गणेश राशनकर, मसर काझी, माजी नगरसेवक सरफराज कुरेशी,नगरसेवक संजय घाडगे, सामाजिक कार्यकर्ते शरीफ तांबोळी, धनाजी जाधव, राजेंद्र जाधव, इरफान शेख, वैभव पवार, जावेद पठाण, बच्चन गायकवाड, राजकुमार माने, बब्बू जिनेरी, दिलीप रणभोर, सुभाष मारकड, सत्तार पठाण, जयंत शिंदे, शंतनु मेहेर, धिरजसिंह ठाकुर, शफी पठाण, सुनिल जगताप, तन्वीर मुजावर, नाजिम मुजावर, संतोष सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, दत्तात्रय रणभोर, वाहिद सौदागर, नासिर सौदागर, आजिम सौदागर, मोहसीन सौदागर, कैफ सौदागर, सोनू सौदागर, मदन दिक्षित, प्रदीप भालेकर, डॉक्टर निकत, मनोज कोळगे, प्रविण चीतमहाल, असिफ शेख, अलताफ पठाण, नुर मदारी, अजमोद्दीन मदारी, अकबर पठाण, शरीफ शेख, समीर शेख, बबलू शेख, शशी जाधव, सुरेश काशिद, मदन दिक्षित, बंटी ठाकुर, हुसेन हन्नुरे, अॅड. सनी राशनकर, अॅड. संदिप शेळके, सतीश मेहेर, गणेश भानवसे, दत्तात्रय भानवसे निवृत्ती भानवसे, ऋषिकेश भानवसे, अशोक भानवसे सागर भानवसे, विशाल भानवसे, किरण भानवसे, हनुमंत भानवसे, महेश भानवसे, रघुनाथ भानवसे, चांद सय्यद, मुस्तफा सय्यद, कल्याण घाडगे, उमेश घाडगे, धनाजी भानवसे, नामदेव भानवसे रोहित भानवसे, दादा भानवसे, रामेश्वर भानवसे, बबन भानवसे, चंदू काशिद, बालाजी भानवसे, समाधान घाडगे, तुकाराम भानवसे, वैभव घाडगे, ऋतुराज घाडगे, विवेक डाके, अतुल भानवसे हनुमंत भानवसे, भिमराव भानवसे, सोपान भानवसे, ओमकार भानवसे, विलास भानवसे, दादा भानवसे, नितिन घाडगे, बळीराम भानवसे, भालचंद्र शिरसकर, उमेश बागल, शंकु माळी, बाळू भानवसे, पृथ्वीराज भानवसे, लखन दनाने, सोहेल जिनेरी, अमोल चौतमहाल, निजाम दखनी, सद्दाम पठाण, जुबेर जिनेरी, अकबर शेख, गौस मुंडे, शिवाजी सोनवणे, बाळराजे माकणीकर, गणेश कदम, गोविंद घोरपडे, वामन शिंदे, विलास शिंदे, विलास शिंदे, यलप्पा काळे, कृष्णा चौधरी, अभिजित जाधव, सलीम शेख, अजहर पटेल, आकाश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुमंत जाधव, नितिन जाधव, नुर तांबोळी, अविनाश बनसोडे, किसान शेलार, राहुल शंकर बनसोडे, बद्रोद्दीन शेख, अभिमान सरक, बापु शिंदे, अलीम पठाण, मुन्ना मोमिन, गुलाब पठाण, अलीम अरब, भगवान रणसिंगे यांच्यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

error: Content is protected !!