परंडा:- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात ढगफूटीसदृश अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौऱ्यात भाजपा नेते श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी भेट घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.
तसेच इतर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांनाही भरीव मदत द्यावी, खरडून गेलेल्या शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी मदत करावी, दगावलेल्या पशुधन मालकांना मदत द्यावी, परंडा,भूम व वाशी तालुक्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा व उच्चांकी पाऊस असल्याचे सांगून सर्व नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी तसेच या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या, नाले व ओढ्यांना महापूर येऊन अनेक गावात व घरात पाणी शिरल्याने घरांचे व साहित्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचेही पंचनामे करण्यात करण्यात यावेत. शेतकऱ्यांचे व नागरिकांचे या मुसळधार अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून त्यांना भरीव मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.