परांडा( माझं गाव माझं शहर) परंडा तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक गावाचा जनसंपर्क तुटला अशात खैरी नदीला महापूर आल्याने मौजे देऊळगाव शेळगाव तांदळवाडी आदी गावांमध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये पाणी शिरल्याची पाहणी करण्यासाठी भूम परांडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांनी २३ रोजी सकाळच्या सत्रामध्ये मौजे देऊळगाव येथील जिल्हा परिषद शाळा व त्या शेजारी रहदारी असणाऱ्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्ला दिला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते