परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुग्रस्त शेतकर्याना आर्थीक मदत वाटपात दिरंगाई .

परंडा ( दि ३ नोव्हेंबर ) परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुरग्रस्त शेतकर्याना तात्काळ आर्थीक मदत वाटप करण्यात यावी अन्यथा दि३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल आसा इशार नालगाव येथील शेतकरी राजकुमार गायकवाड यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला होता.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की अतिवृष्टी व पूरग्रस्त परंडा तालुका आहे. याची प्रशासनाने वेळेत माहिती सादर केली नाही.यापुढेही नुकसानीची माहिती कधी पाठवणार याची खात्री नाही.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होत असतात. शासनामध्ये पदाधिकारी यांचे मानधन व भत्ते वेळेत उपलब्ध होतात. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊन ही याचे गांभीर्य प्रशासनाला नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व महापुराने नुकसान झालेल्या भागाची पाहाणी करून दिवाळी पूर्वी अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे जाहीर केले होते.मात्र परंडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याच अद्याप दाखल नाहीत.त्यामुळे शेतकर्यांना आर्थीक मदत कधी मिळणार याचा भरवसा नाही.
दि.२ऑक्टोंबर पर्यंत अतिवृष्टी,पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात आर्थिक मदत जमा न झाल्यास दि.३ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालय परांडा येथे प्राणांतिक उपोषणाला बसणार आसल्याचे निवेदनात म्हटले होते. गायकवाड यांच्या मागणी नुसार परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुरग्रस्त बहुतांशी शेतकर्यांना शासनाची आर्थीक मदत मिळाली नसल्याने गायकवाड यांनी दि.३ नोव्हेंबर पासुन तहसील कार्यालया समोर प्रांतीक उपोषण सुरू केले आहे.

error: Content is protected !!