हरित धाराशिव अभियान; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद.

1752943878699

धाराशिव(प्रतिनिधी) पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या पर्यावरणपूरक संकल्पनेचा महाराष्ट्रात विस्तार करत, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने १० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. याच संकल्पनेतून धाराशिव प्रशासन आणि लोकसहभागातून आज एका दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षारोपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

धाराशिव तालुक्यातील शिंगोली शिवारात वन विभागाच्या ५ हेक्टर क्षेत्रावर जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून ‘हरित धाराशिव अभियान’ अंतर्गत १५ लक्ष वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री मा.श्री. प्रतापजी सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सिनेअभिनेते श्री. स्वप्नील जोशी, जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

धाराशिव जिल्हा नोंद

या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायती, १३ नगरपालिका व ३ नगर पंचायती अंतर्गत विविध ठिकाणी १५ लक्ष वृक्षांची लागवड करत धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये रेकॉर्ड नोंद झाली आहे. हा विक्रम रचण्याचा मान धाराशिवला मिळाला ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

आज आपण लावत असलेली झाडे जगविण्यासाठी लोकप्रतिनिधी व सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी सर्वांना केले.याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!