गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले…

तुळजापूर (प्रतिनिधी)दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे प्रमुख आणि गुरुमाऊली म्हणून परिचित असलेले आदरणीय श्री.अण्णासाहेब (दादा) मोरे यांनी सपत्नीक दि.३० जुलै रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म, कुलाचार आणि श्रद्धाभावाने देवीची पूजा अर्चा केली.

यावेळी मोरे दांपत्यांनी मंदिरात देवींची आरती केली व देवीच्या चरणी ओटी भरून आपल्या श्रद्धेचा भाव अर्पण केला. त्यांनी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मोरे दांपत्याचा सत्कार करण्यात आला.

गुरुमाऊली आदरणीय श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात व भक्त गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वामी समर्थांच्या कार्यातून अनेकांना आध्यात्मिक ऊर्जा देणारे मोरे हे हजारो अनुयायांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या तुळजापूर भेटीने भाविकांमध्येही विशेष उत्सुकता निर्माण झाली होती.

Leave a Reply

error: Content is protected !!