परंडा-(प्रतिनिधी)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या कौशल्यात भर पडून त्यांच्यात संशोधनात्मक वृती जागी होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी दरवर्षी आशाप्रकारच्या तंत्रप्रदर्शणाचे आयोजन करण्यात येते.नंतर येथून त्यांची विभागीय पातळी करिता निवड करण्यात येते.धाराशिव येथील भाई उध्दवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि 23 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी विविध प्रकारचे प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते. सदर प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून तीन प्रोजेक्ट ची निवड जिल्हास्तरावर कऱण्यात आली होती.
शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील फिटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थीनी हॅण्ड कॅन क्रशर प्रोजेक्टची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली.
जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनात आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एक खासगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था मधून एकूण 29 प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते त्यापैकी कल्याणस्वामी महाराज शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील फिटर व्यवसायाच्या करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे आणि शासकीय तंत्रनिकेतन येथील स्वंचल विभागाचे प्रमुख एल एम माने व संस्था व्यवस्थापन समिती चे निशांत होणमुठे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य, शिल्पनिदेशक, आणि प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते.या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य केशव पवार, गटनिदेशक फत्तेसिंह जगताप, सर्व शिल्पनिदेशक व शिल्पनिदेशिका यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन केले.