कळंब तहसील कार्यालया मार्फत ४० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप

कळंब (प्रतिनिधी) कळंब तहसील कार्यालया च्या योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र ४० लाभधारकांना प्रत्येकी दोन ब्रास वाळूचे मोफत वाटप कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या आदेशानुसार वाटप करण्यात आले. तालुक्यातील पंचायत समिती विभागाच्या वतीने तहसील कार्यालयात प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ६१ लाभार्थींची यादी कळंब तहसीलदार यांना देण्यात आली होती. यामध्ये सदरील घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करून प्रत्येकी दोन ब्रास वाळू देण्याचे आदेश तहसीलदार यांनी देण्यात आले असून आतापर्यंत एकूण ४० लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यात आली आहे.दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील वाळु डेपो मधील प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत सात लाभार्थींना प्रत्येकी दोन ब्रास अशी वाळू वाटप करण्यात आली आहे. यावेळी कळंब महसूल चे नायब तहसीलदार गोपाल तापडिया, महसूल अधिकारी ए आर पवार ,डिकसळ सज्जाचे तलाठी इंगळे, व कार्यालयीन मदतनीस भागवत कदम यांच्या सह कळंब तालुक्यातील घरकुल लाभधारक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!