परंडा / प्रतिनिधी(तानाजी घोडके) छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे संस्थापक, सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. २९) विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. सूर्यप्रभा हॉस्पीटल येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष दादासाहेब खरसडे, जि.प. माजी सदस्य महादेव अंधारे, जि.प. माजी सदस्य गौतम लटके, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जि. प. माजी सभापती नवनाथ जगताप, बाणगंगा साखर कारखाना संचालक भाऊसाहेब खरसडे, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी,ड पठाण, संतोष सुर्यवंशी, शब्बीर पठाण, हाजी वाजीद दखनी, ड. अजय खरसडे, बालाजी नेटके, विशाल देवकर, नानासाहेब पवार, माऊली गोडगे, समीर पठाण, सचिन खरसडे, महेश ठोंगे, नाना मोरे आदि उपस्थित होते. विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी पवार यांचा सत्कार केला. तसेच वाढदिवसा निमीत्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २११ जणांनी रक्तदान केले . परंडा पोलीस ठाण्यासमोर वृक्षारोपण, जिल्हा परिषद शाळा करंजा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यास पावसाळी छत्री व पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले. बावची रोडवरील महाराणा प्रताप चौक येथील कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला