परंडा(प्रतिनिधी)सिना कोळेगाव प्रकल्प डोंमगाव हा परंडा तालुक्यातीलच शेतकऱ्यांना नव्हे तर ३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न वाढवणारतर आहेच सोबत तहान भागवणारा देखील आहे आज शेतकऱ्यांनच्या अडचणी व पाणी विषयांवर सकारात्मक चर्चा करताना ॲड दत्तात्रय बाबासाहेब सुर्यवंशी व डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सकारात्मकता दाखविण्याची तयारी तात्काळ असल्याने सर्वांचं आभार मानले यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री एस मस्तुद, उपकार्यकारी अभियंता ए.एस वचकल, ॲड नागनाथ सुर्यवंशी, ॲड नानासाहेब गटकूळ, मा. सरपंच नवनाथ मोरे, वरीष्ठ जेई जोशी, जेई झुंजकर, प्रविण शिंदे, प्रविण नेटके, संगवे, क्षीरसागर आदी कर्मचारी उपस्थित होते.
सिना कोळेगाव प्रकल्प येथे कार्यकारी अभियंता श्रीम. कल्याणी कालेकर पाटील यांचा सत्कार.