परंडा ( प्रतिनिधी) शहरातील समर्थ तरुण गणेश मंडळ सोमवार गल्ली यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन परंडा पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक चोरमोले शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मुकुल मालक देशमुख, पोलीस पाटील संजय कदम, अब्बास मुजावर, पुरुषोत्तम वैद्य व संजय वैद्य उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्री ची आरती करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती रॅलीमध्ये रावसाहेब पाटील विद्यालय चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही फेरी मंगळवार पेठ विभागातून रॅली काढण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शरद डोरले व मार्गदर्शक पुरुषोत्तम वैद्य यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व व व्यसनमुक्ती याविषयी मार्गदर्शन केले.
या रॅली मध्ये शाळेचे शिक्षक पाटील सर, पोळ सर, येमले सर करंडे सर, वडतीले सर, जाधव सर तसेच शाळेतील शिक्षिका व मंडळाचे अध्यक्ष शरद डोरले, कुणाल पवार, ओंकार वैद्य, गौरव काळे, शंभु विद्वत, , संतोष कदम ,औदुंबर यादव, उमेश पालके, प्रसन्न थोरबोले, किरण वैद्य, जयेश विद्वत, प्रसाद वैद्य, नागेश वैद्य, निलेश पालके, गणेश पालके, प्रथमेश पालके, पृथ्वीराज कदम, आकाश काळे, दादा वडतीले, अमोल कल्याणकर आदी सहभागी झाले होते.
या रॅलीच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच ऋषीपंचमीच्या निमित्ताने महिलांनी श्री अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
तसेच दिनांक 4 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी पोवाडा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे .दिनांक 06 सप्टेंबर रोजी भजनी मंडळाचे भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंडळातील कार्यकर्त्यांकडून जवळील मंदिरांचे साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. दरवर्षी हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते, अशी माहिती देण्यात आली आहे