परंडा(तानाजी घोडके) उद्योगक्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे परंडा तालुक्याचे नाव यशाच्या शिखरावर पोहोचविणारे उद्योजक रामचंद्र पवार तसेच आपल्या लेखणीद्वारे साहित्य क्षेत्राला प्रभावित करणारे साहित्यिक तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. परंडा तालुक्यातील या दोन्ही भूमिपुत्रांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
उद्योजक परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष व सुर्याप्रभा हॉस्पिटल चे सर्वेसर्वा शेतकरी पुत्र रामभाऊ पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद २०२५ यांच्या वतीने महात्मा फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ शरद गोरे यांनी पवार यांना पुरस्कार संबंधित लेखी पत्र दिले आहे. आजपर्यंत केलेल्या सामाजिक शैक्षणिक अरोग्य या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून सदर पुरस्कारासाठी आपली सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यांच्या या कार्याबद्दल महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे तसेच जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांचीही निवड करण्यात आली आहे. २३ नोहेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक कवि मा. किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले प्रबोधन महात्मा फुले साहित्य संमेलन उद्घाटण सत्रात मान्यवरांच्या हस्ते उद्योजक रामचंद्र पवार, साहित्यिक तुकाराम गंगावणे यांना पुरस्काराचे वितरण होणार आहे. परंडा तालुक्यातील या दोन्ही भूमिपुत्रांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.