रा.प.परंडा बसस्थानकात चालक दिन साजरा ;देशमाने यांच्या हस्ते चालकांचा सत्कार

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रा प परंडा बसस्थानकात चालक दिन २०२६ साजरा करण्यात आला. कोरोना काळात जग ठप्प असताना शासन आदेशानुसार परप्रांतीय नागरिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक तसेच प्रवाशांना सुरक्षित सेवेसाठी समर्पित चालकांचा परंडा आगारातील चालकांचा यावेळी आगार प्रमुख श्री बालाजी मुळे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे  तसेच पञकार बांधव श्री गोरख देशमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाहतूक नियंत्रक श्री कल्याण कुंभार , अतिकखुल्ला हुसेनी, संजय कदम, जेष्ठ लिपिक श्री शिवलकर, आदी. मान्यवर उपस्थित होते. इंधन बचत करणारे चालक श्री प्रशांत मांजरे व तात्या पिंगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अंकुश धुर्वे, सविता शिंदे मावशी, तसेच आगारातील कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
आलेल्या पाहुण्यांचे वाहतूक नियंत्रक श्री कल्याण कुंभार यांनी आभार मानले

error: Content is protected !!