परंडा (प्रतिनिधी): राज्याचे माजी आरोग्यमंत्री , आमदार डॉ. तानाजी सावंत यांना मागील आठवड्यात अचानक चक्कर येणे, उलटी आणि हृदयाची धडधड जाणवल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अनेक राजकीय नेते त्यांना भेटून त्यांची विचारपूस करत होते. मंगळवारी युवा सेना परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके यांनी आमदार डॉ. सावंत यांच्या भेटीला जाऊन तब्बेतीची चौकशी केली . आमदार डॉ. तानाजी सावंत रुग्णालयात असताना राहुल डोके यांची भेट होऊ शकली नव्हती म्हणून आमदार डॉ. सावंत यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहुल डोके यांनी त्यांच्या पुण्यातील जे.एस.पी.एम. कार्यालयात जाऊन भेट घेतली.यावेळी युवासेना परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके, भूम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निलेश शेळवणे, संचालक विशाल ढगे, संचालक समाधान सातव, माजी संचालक युवराज तांबे यांनी सदिच्छा भेट घेत सत्कार केला. तसेच संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली.