परंडा(माझं गांव माझं शहर) तुळजापूर येथील भाजपा मा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा जैन प्रकोषठचे मा. सहसंयोजक श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे यांची कन्या डॉ. कु. अंकिता व्यवहारे ही वैद्यकीय शिक्षण (MBBS) जार्जिया येथे पूर्ण करून भारतातील एफएमजीई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. आज डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिने परंडा येथे ‘संवाद’ निवासस्थानी भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी डॉ. अंकिता हिचा फेटा बांधून, शाल व पुष्पहाराने सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ. शैलाभाभी ठाकूर, भाजपा नेते ॲड. श्री. अनिल काळे व श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे उपस्थित होते.