परंडा (दि. ६डिसेंबर)शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे त्याच मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगता येते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारत देशाची घटना लिहिली त्यामुळे आज आपण या भारतीय संविधानामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अठरापगड जातीसाठी दीनदलित गोरगरीब वंचित घटकासाठी व शेतकरी महिला यांच्यासाठी अनमोल असे कार्य केले आहे. शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा विविध कार्यक्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक भारतीयांनी त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना केले. शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी व प्राचार्य डॉ महेश कुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे परिवेक्षक प्रा किरण देशमुख शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ कृष्णा यांची उपस्थिती होती. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले . अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला तर प्रा किरण देशमुख यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
याच प्रसंगी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांना श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .