डोंजा जिल्हा परिषद गट प्रचार शुभारंभ; आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते.

परंडा(तानाजी घोडके) श्रीक्षेत्र सोनारी येथे काळभैरवनाथांचे दर्शन घेऊन, परंडा तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या डोंजा जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. अविदाबाई भागवत जगताप, पंचायत समिती डोंजा गणाचे अधिकृत उमेदवार शशिकांत चंद्रकांत पाटील, आणि पंचायत समिती सोनारी गणाचे अधिकृत उमेदवार समाधान सुभाष नलवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला, महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते हा नारळ वाढवण्यात आला.

याप्रसंगी सावंत साहेबांनी उपस्थित जनसमुदायाला व कार्यकर्त्यांना प्रचारासंदर्भात सखोल मार्गदर्शन करून तिन्ही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. “आपल्या भूम-परंडा-वाशी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


ते पुढे म्हणाले की, “ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्याची नसून, आपल्या गटाची, गणाची आणि गावाच्या भविष्याची दिशा ठरवणारी आहे. ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण विकासाची अपेक्षा करू शकतो, अशा सक्षम, कर्तव्यदक्ष आणि जनतेशी नाळ जोडलेल्या उमेदवारांना आपले अमूल्य मत देऊन बळकट करा. येणाऱ्या ७ फेब्रुवारीला ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.”

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, आरपीआय प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, मा.जि.प. सभापती नवनाथ आप्पा जगताप, रामचंद्र घोगरे सर, सोनारी मा. उपसरपंच अंगद आबा फरतडे, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, ॲड. रणजीत खरसडे, पै. विशाल नाना देवकर, बालाजी नेटके, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, रोसा सरपंच रवींद्र नलवडे, कुंबेजा सरपंच शिवाजी मिसाळ, गोकुळ चव्हाण, लक्ष्मण मोरे, शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!