परंडा (शेळगांव ) दारूच्या नशेत एका पित्याने आपल्याच नव वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. ही हृदय पिळऊन टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उढाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचे नाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. शेळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन झाले होते त्याच्या या व्यसनामुळे त्यांची मुलगी गौरी ही आपल्या आजी सोबत राहत होती. गौरी गावातीलच शाळेत इयत्ता चौथी शिकत होती दोन वर्षांपूर्वी तिची आजी घरी नसताना दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वर गौरीवर कुराडीने हल्ला केला डोक्यात घाव बसल्वयाने गौरीच्या जागीच मृत्यू झाला.
हत्यामागचे आजारपणाचे कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी वारंवार आजारी पडत होती याच कारणावरून बाप ज्ञानेश्वर ने तिची हत्या केल्याचे सांगितले जात आहे मात्र त्यांच्या या दारूच्या व्यसनामुळे हे राक्षेची कृत्य घडल्याचे स्पष्ट झाले आहे धक्कादाय बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर ने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र घरी परतलेल्या आजीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी तात्काळ घटनांस्थळी धाव घेऊन आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावले आहे एका बापानेच आपल्या निरागस मुलीचा जीव घेतल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.