परंडा (प्रतिनिधी)मतदारसंघातील महा भयंकर नैसर्गिक आपत्तीचे संकटातून उद्भवलेली महापूर परस्थीतीने शेतकरी व शेतमजुरांचा संसार कोलमडला, जगण्याची भ्रांत झाली मतदारसंघाचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत तथा मा.आरोग्य मंत्री तात्काळ मदतीला धावून आले.
अत्यावश्यक सर्व मदत प्रशासनाशी समन्वय साधून मायेचा आधार दिला, तशाच दिपावली सारखा महत्त्वाचा सण आला, व शेतकरी, शेतमजूर, दिन दलित, गरीब जनतेच्या प्रेमापोटी दिपावलीचा फराळ तयार करून परंडा भूम वाशी तालुक्यातील जनतेला वाटप करण्याचे काम तात्काळ सुरू केले,
त्याचाच एक भाग म्हणून परंडा, येथील मदारी समाजातील व शेतमजूर गरीब लोकांना श्री धनंजय सावंत, श्री रामचंद्र घोगरे सर, श्री दत्ता साळुंखे नगराध्यक्ष श्री जाकीरभाई सौदागर, श्री राहुल डोके, यांचे संकल्पनेतून श्री संजय कुमार बनसोडे, श्री विजय कुमार बनसोडे यांचे हस्ते वाटप करण्यात आले, परंडा मतदार संघास लाभलेले दानशूर आ.डॉ प्रा तानाजीराव सावंत, यांचे कार्यकर्तत्वाचीच ही देण..