धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार..

धाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. पोलीस उपनिरीक्षक मधुकर काशिनाथ घायाळ, पोलीस सहाय्यक फौजदार बिभीषण भगवान लोंढे, राजेंद्र मोहनराव राऊत, उमाकांत लक्ष्मणराव माळाळे आणि पोलीस हवालदार उल्हास दगडू वाघचौरे यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी भूषवले. त्यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी-अंमलदारांना सन्मानचिन्ह व शुभेच्छा देण्यात आल्या. सेवानिवृत्त अधिकारी आपल्या कार्यकाळातील आठवणी सांगताना भावनाविवश झाले.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्यासह अधिकारी व अंमलदारांची उपस्थिती होती. निवृत्त होणारे अधिकारी आपापल्या कुटुंबियांसह समारंभात सहभागी झाले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!