धाराशिव – कळंब मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा.

Suraj Slunkhe VS Pratap sarnik

धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्यासमवेत धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सविस्तर चर्चा केली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. सरनाईक यांनी केले.

मुंबई येथे मंत्री ना. सरनाईक यांच्या कार्यालयात झालेल्या या चर्चेत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढविण्याचा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्रे एकनाथजी शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिल्यांदाच होत आहेत. त्यासाठी सर्व निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. शहरापासून गाव खेड्यांपर्यंत विविध विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जनतेच्या मूलभूत सुविधा आणि विविध विकासकामांना गती आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निष्ठावंत उमेदवारांना संधी देऊन या निवडणुकीत सेनेचा भगवा फडकविण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. सरनाईक यांनी केले. त्याचबरोबर धाराशिव शहरातील विविध विकासकाांसाठी निधीबाबत द्देखील यावेळी चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!