अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.सतीश पाटील अभिनंदनीय निवड.


पुणे (माझं गांव माझं शहर)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सतीश उत्तमराव पाटील यांची अभिनंदनीय निवड करण्यात आल्याचे पञ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी पाठवले.
       प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील आपल्या भरीव योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आपली “धुळे जिल्हा उपाध्यक्ष” पदी निवड करीत आहोत.आपण आपल्या कुशलतेने साहित्य परिषदेचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवाल व सुदृढ समाज स्वास्थ्य राहील यासाठी अविरतपणे कार्यरत रहाल ही आपल्याकडून अपेक्षा आहे.आपल्या कार्याद्वारे सात्विक सुविचारांची पेरण करून समानतेचा मळा फुलवाल ही खात्री आहे.आपणांस नवीन जबाबदारीसाठी आभाळभर शुभेच्छा!

  मनोमंदिराच्या गाभाऱ्यात सदविचारांची सार्थकता अढळ राहील.साहित्यातून विचारांची दिशा कळते, साहित्यातून समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटते.साहित्य निर्मितीत केवळ कथा, कादंबरी, नाटक आणि कविता एवढ्या प्रकारातून साहित्य निर्मिती होत नसते, तर अभ्यासक्रमातून विविध विषयांतून त्याचे चिञण उमटत असते,तर अनेक वाङ्मयप्रकारातून साहित्य निर्मिती होत असते,साहित्याची समीक्षा आकलन, आस्वाद, मूल्यमापन या प्रक्रियेतून घडत असते. साहित्यसमीक्षेमध्ये या तिन्ही घटकाला विशेष असे महत्त्व असते.साहित्यातील सांस्कृतिक सामाजिक अर्थ लावून त्या काळाचा आणि त्या साहित्यकृतीचा अनुबंध लावणे, त्या साहित्यकृतीतील सामर्थ्यावर मार्गदर्शन करणे. साहित्यलेखनासाठी दिशा दाखविणे हेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदांचे कार्य असते असे प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांची निवड सार्थकी लागेल असे अ.भा.मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे व शुभांगीताई काळभोर,राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी एका पञाद्वारे कळविण्यात आले आहे.प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांचीउपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अध्यक्ष डॉ.शरद गोरे,जिल्हाध्यक्ष हिरामण सोनवणे,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,माजी आमदार प्रा.शरद पाटील,माजी आमदार कुणाल पाटील,आ.रोहित पाटील,अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे,यशदाचे उपसंचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी,संचालक के.एस.गांगुर्डे,यजुर्वेद्र गांगुर्डे,जयेश मराठे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!