परंडा(प्रतिनिधी )ऑपरेशन सिंदुर सारख्या संवेदनशील आणि भारत देशाची प्रतिमा उंचावली असुन अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणा-या भारतीय सैन्याबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी. अशी भाजपा तालुका व शहराच्या वतीने दि.३० जुलै रोजी करण्यात आली. अशा वक्तव्याने लष्करी सैन्याचे मनोधैर्य कमी होण्याची शक्यता आहे. सोलापूर च्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत भारतीय सैन्याबद्दल भाष्य केले. हे भाष्य आतंकवाद्यांना पोषणाच्या उद्देशाने लोकसभेत बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे देशातील नागरिकांच्या आणि सामान्य देशभक्त यांच्या भावना दुखावल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाचाळवीर वक्तव्याचा निषेध करून परंडा भारतीय जनता पार्टी व शहराच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, शहर तालुकाध्यक्ष उमाकांत गोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड जहीर चौधरी, माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ॲड. भालचंद्र औसरे, शिवाजीराव पाटील, धनाजी गायकवाड, साहेबराव पाडुळे, अजित काकडे, अर्जुन कोलते, राहुल जगताप, नागेश शिंदे, पांडुरंग मुसळे, जयंत सायकर, किरण कवटे, प्रकाश फरतडे, संपत्ती भोळे, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, आदर्श ठाकूर, व्यंकटेश दिक्षित, विवेक ठक्कर तसेच महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गायत्री तिवारी, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.