तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान: एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही – खा. ओमराजे निंबाळकर
तुळजापूर(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील सावरगाव आणि परिसरातील गावांमध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की,…