काशीमबाग येथे श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांची पुण्यतिथी साजरी.
परंडा (प्रतिनिधी) हा जन्म पुन्हा नाही ,गेलेला दिवस, वेळ पुन्हा येणे नाही . सुख – दुःख सतत येत असतात . सुख आलं म्हणून माजायचं नाही आणि दुःख झालं म्हणून खचायचं नाही . जीवन सुखी करण्यासाठी संतांची शिकवण महत्वाची आहे . अनिष्ठ रुढी , परंपरा तथा अंधश्रध्देच्या विरुद्ध पहिले पाऊल श्री संत सावता माळी महाराजांनी टाकले…