अस्थिव्यंग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन.

सोलापूर(प्रतिनिधी) दि.२ – केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई, मार्फत एस. आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, जिल्हा समाज कल्याण विभाग, सोलापूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सोलापूर यांच्या सहकार्याने एडिप योजनांतर्गत सोलापूर जिल्हयातील तालुका निहाय अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिफर्स यांचे…

अधिक बातमी वाचा...

राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश

मुंबई(प्रतिनिधी )राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उद्या आणि परवा शाळांना सुट्टी नसेल. यापूर्वी 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार होत्या, परंतु आता शिक्षण विभागाने शाळा बंद…

अधिक बातमी वाचा...

अखेर सहशिक्षक पी. एम. मोहोळकर निलंबित..

परंडा, (प्रतिनिधी)दि. ३- तालुक्यातील चिंचपूर बु. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे सहशिक्षक पी. एम. मोहोळकर हे वारंवार मद्यप्राशन करून शाळेत येत असल्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मोहळकर हे २८ जून रोजी मद्यप्राशन करून शाळेत आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांचा मद्यप्राशन करून…

अधिक बातमी वाचा...

श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केले स्वागत

परंडा(तानाजी घोडके) भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे अतिशय सुंदर भक्तीमय वातावरणात परंडा येथे स्वागत केले. भगवान गड येथील श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे आगमन कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली. भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी…

अधिक बातमी वाचा...

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच उदंचन जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होणार

मुंबई(प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर’ यांच्यामध्ये तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून, येत्या काळात अपारंपारिक…

अधिक बातमी वाचा...

परंडा: पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची केली सुटका.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. यामध्ये ४ जर्सी गायी आणि २६ वासरांचा समावेश असून, त्यांची किंमत सुमारे २,३०,००० रुपये आहे. ही घटना जवळा (नि.) परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली, ज्यामुळे स्थानिक जनतेमध्ये चिंता आणि संताप व्याप्त झाला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि….

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र

रामचंद्र पवार यांचा वाढदिवस: समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा.

परंडा / प्रतिनिधी(तानाजी घोडके) छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे संस्थापक, सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. २९) विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. सूर्यप्रभा हॉस्पीटल येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जि.प. चे माजी उपाध्यक्ष दादासाहेब…

अधिक बातमी वाचा...

टाळ मृदंगाचा गजर आणि भानुदास एकनाथ हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात आगमन

परंडा ता.३० ( तानाजी घोडके) “पंढरीशी जारे आल्यांनो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! वाट पाहे उभा भेटीची आवडी! कृपाळु तातडी उताविळ!भानुदास एकनाथ नामाचा जयघोष ,टाळ-मृदंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री क्षेञ पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी ता.२९ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता, शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नाथ चौकात आगमन झाले.मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

परंडा(प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!