धाराशिव जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी ; शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची होणार तपासणी- शिक्षणाधिकारी नागेश मापारी
धाराशिव-(प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमान्वये पात्र लाभार्थ्यांना शासनाचे लाभ देणे आवश्यक असल्याने धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी व पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या…