अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप.

परंडा दि.२७ (प्रतिनिधी) सध्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी महापूर आल्याने अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.अनेक गावामध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील खाण्याची राहण्याची अत्यावश्यक सर्व वस्तू मुसळधार पावसाने वाहून गेले आहे संपूर्ण घर पावसामध्ये असल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. तेव्हा अशा…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग सेस योजनांच्या अर्जासाठी मुदतवाढ- तानाजी घोडके(दिव्यांग अध्यक्ष)

धाराशिव,दि.२६ सप्टेंबर (माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद स्वसंपादीत उत्पन्नातील ५ टक्के दिव्यांग सेस अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य तसेच अतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना सहाय्य या योजनांचा समावेश आहे. पूर्वी अर्ज स्वीकृतीसाठी २६ सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.मात्र लाभार्थी व दिव्यांग संघटनांच्या…

अधिक बातमी वाचा...

माणकेश्वर व देवगाव येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची प्रवीण रणबागुल यांच्याकडून मदत

भुम / परंडा-दि,२५( प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आभाळ फाटल त्यांच सगळच हिरांवल हा जलप्रलयाचा भूकंप आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा पुर आहे, पिकांच अतोनात नुकसान झाले असुन स्वप्नांचा चिखल हे वास्तव त्यांच्या जीवनात आहे.अतिवृष्टीमुळे हाजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.शेतकरी शेतमजुरांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.जगावं की मरावं हे त्यांना कळायला मार्ग नाही सर्वच पिके…

अधिक बातमी वाचा...

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त अभिवादन करताना-मा.आ. सुजितसिंह ठाकूर

परंडा :- एकात्म मानवतावादाचे आणि अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, कुशल संघटक आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंती निमित्त भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले..! पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय राजकारणातील एक प्रमुख प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि समाजसुधारक होते, ज्यांनी “एकात्म मानवतावाद” या…

अधिक बातमी वाचा...

शेळगाव- माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र !

शेळगाव(प्रतिनिधी) अतिवृष्टीची वक्रदृष्टी हे विदारक मन हेलावून टाकनारं हे चित्र आहे परंडा तालुक्यातील सर्वाधिक पाण्याने वेढा दिलेले गाव म्हणजे शेळगाव याच गावातील माणिक बाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे या विद्या मंदिरात हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे गिरवून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल केली. शाळेची आज दुरावस्था केली ती प्रचंड बरसलेल्या मेघराजाने नदीकाठावर असलेली माणिक बाबा माध्यमिक व…

अधिक बातमी वाचा...

तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या नित्योपचार पूजेला भाविकांची गर्दी

तुळजापूर, २५ (माझं गांव माझं शहर ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला तुळजापुरात मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला, म्हणजेच आज गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी, देवीची नित्योपचार पूजा मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने संपन्न झाली. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटे ६ ते सकाळी…

अधिक बातमी वाचा...

परंडा- रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा पूरग्रस्त गावाला मदतीचा हात.

परंडा दि.२५ (प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गाव वाघेगव्हाण या गावास भेट देऊन ज्या लोकांचे मुसळधार पावसाच्या पाण्याने नुकसान झालेले आहे संसार उघड्यावर पडले आहेत अशा लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचे किट…

अधिक बातमी वाचा...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरीव मदतीची मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

परंडा:- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात ढगफूटीसदृश अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौऱ्यात भाजपा नेते श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी भेट घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच इतर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांनाही भरीव मदत द्यावी, खरडून गेलेल्या शेतजमिनी पूर्ववत करण्यासाठी मदत करावी, दगावलेल्या पशुधन मालकांना मदत द्यावी,…

अधिक बातमी वाचा...

प्रविण रणबागुल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली मदत;ओला दुष्काळ जाहीर करा

भुम/परंडा – दि. २४(प्रतिनिधी) भूम-परंडा तालुक्यात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि नद्यांना आलेला महापूर निसर्गाचा कोप यामुळे तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी या अस्मानी संकटामुळे संकटात सापडला असून शेतकरी बांधवांना धिर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान…

अधिक बातमी वाचा...

भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी- प्रवीण रणबागुल

परंडा(तानाजी घोडके) भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकरी यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या मोठ्या संकटात बाधितांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या भागात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतीचे माती वाहून गेल्या मुळे भरून न येणारे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्त देवगाव (खु.) येथे आरोग्य पथकातर्फे ग्रामस्थांची तपासणी व औषधोपचार

परंडा (माझं गांव माझं शहर) देवगाव (खु.) येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आसू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नळगाव उपकेंद्राच्या आरोग्य पथकाने गावात वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरामध्ये गावातील पूरग्रस्त आणि गरजू व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना जागेवरच आवश्यक औषधोपचार देण्यात आले. गावात पुराचे पाणी शिरल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही…

अधिक बातमी वाचा...

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने १५० पूरग्रस्तांची सुखरूप सुटका

परंडा(तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण परिसरात आज आलेल्या भीषण पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल १५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. जीव धोक्यात घालून करण्यात आलेल्या या यशस्वी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. खासदार निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वाघेगव्हाण परिसरात पुरामुळे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!