धाराशिव जिल्ह्याची ‘मागास जिल्हा’ ही ओळख पुसण्यासाठी एकात्मता आणि सहकार्याची गरज;डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.“तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता – हा अनावश्यक राजकीय खेळ आता धाराशिवकरांच्या अंगलट येत आहे….

अधिक बातमी वाचा...

देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था- प्रशासनाचे दुर्लक्ष

परंडा( प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. देवगांव ( बु ) येथील रस्ता हा वर्दळीचा आहे. अतिवृष्टीमुळे नळी नदीच्या पुलावरून पाणी चा जोराचा प्रवाहा होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या आहेत. दोन्ही बाजू खचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.     तसेच या रस्तावरून देवगांव ( बु ) व…

अधिक बातमी वाचा...

परंडा किल्ल्यावर शहाजीराजे आणि मातोश्री जिजाबाई यांचे वास्तव्य;दुर्गरक्षक प्रेमी

परंडा(माझं गांव माझं शहर) उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत. प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी. या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक,…

अधिक बातमी वाचा...
BARSHI MURUD

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूम (प्रतिनिधी )मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे….

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...

सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव:(प्रतिनिधी) राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापाऱ्यांकडून केवळ ३,००० ते ३,५०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांगांना संजीवनी : एक हात मदतीचा!

नागपूर(माझं गांव माझं शहर) मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये एक समाजमनाला स्पर्श करणारा उपक्रम पार पडला. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले. जवळपास पाचशे दिव्यांग लाभार्थ्यांना पारदर्शक लॉटरी प्रक्रियेनंतर आणि वैद्यकीय तपासणीनंतर ई-रिक्षा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे आत्मनिर्भरतेच्या प्रवासात दिव्यांग बांधवांना…

अधिक बातमी वाचा...

संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपले योगदान देण्याची गरज – प्राचार्य डॉ शंकर अंभोरे

संभाजीनगर(माझं गांव माझं शहर) डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनीत पावलाने स्थापन झालेल्या नागसेनवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये स्वाभिमानी मुप्टा प्राध्यापक संघटनेचा केंद्रीय व सर्व जिल्हा कार्यकारिणीचा महत्वपूर्ण सवांद मेळावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य प्रोफेसर डॉ शंकर अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या मेळाव्यात महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . या बैठकीत प्रामुख्याने…

अधिक बातमी वाचा...

देवगाव (बु) येथील वाघीणगड निवासस्थानी सुरू असलेले उपोषण स्थगित- मांगले

परंडा दि. १८ (तानाजी घोडके) राजकारणाच्या रंगमंचावर कधी कधी असे क्षण येतात, जे फक्त एका उमेदवाराचा निर्णय नसतो, तर तो लोकभावनेचा, मूल्यांचा आणि नात्यांचा आरसा ठरतो. अशाच एका क्षणाचा साक्षीदार ठरला परंडा-शेळगाव सर्कल!    जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष म्हणून घोषित झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष एकाच नावावर थांबले होते  दिनेश रोहिदास मांगले. यांची प्रामाणिकतेची…

अधिक बातमी वाचा...

खर्डा ग्रामस्थांचा माणुसकीचा हात; तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते ‘दिवाळी फराळ किट’चे वाटप

परंडा (माझं गांव माझं शहर) : (दि. १५ ऑक्टोबर) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परंडा तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या घरात अंधार दाटला असताना, खर्डा येथील ग्रामस्थांनी ‘आपुलकीचा शेजारी धर्म’ जपून या पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘आपुलकीचा फराळ’ या उपक्रमांतर्गत खर्डा व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले फराळाचे बॉक्स परंडा…

अधिक बातमी वाचा...

महानगरपालिका दिव्यांगांना घरकुल देत नसल्याने दिव्यांगांनी थेट धरला आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला !

जालना (प्रतिनिधी) दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदने दोन वेळेस अमरन उपोषण करूनही महानगरपालिका जाग येत नसल्याने दिवेंगांनी थेट आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला धरलाय शासकीय बंगल्यावरती ठाय्या आंदोलन करत असताना आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले की महानगरपालिकेत या तिथं सविस्तर चर्चा करतो इथं येऊ नका दिव्यांगानी महानगरपालिकेत…

अधिक बातमी वाचा...

कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण अभ्यासक्रम चे उद्घाटन संपन्न.

परंडा – येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे ३ महिन्याचे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षणाचे एकुण ६ अभ्यासक्रम चे उद्घाटन दिनांक ०८ रोजी दुपारी ३:३० वाजता भारत देशांचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!