सोनारी ता. परंडा येथील जनता दरबारास नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद..

परंडा:- भारतीय जनता पार्टी च्या वतीने नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील सोनारी पंचायत समिती गणात सोनारी येथील ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १४७ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करीत…

अधिक बातमी वाचा...

भा ज पा परंडा तालुक्याची नुतन पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणा-अरविंदबप्पा रगडे

परंडा (माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर, मा.आ.श्री. राणाजगजितसिंह पाटील, मा.आ.श्री. बसवराज पाटील व जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याची नुतन पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी केली असून त्यात ०६ उपाध्यक्ष, ०२ सरचिटणीस, ०७ चिटणीस व ०१ कोषाध्यक्ष तसेच कायम…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्हा परिषद मध्ये मद्यपान केलेल्या ९जणांची अचानक तपासणी.

धाराशिव(प्रतिनिधी)  जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आज (दि.१०) रोजी सकाळी अचानक ९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी नियमित आरोग्य तपासणी नसून थेट ब्रीद ॲनालायझर टेस्ट घेण्यात आली होती. शिक्षण विभागात काही कर्मचारी कर्तव्यावर असतानाच मद्यप्राशन करून कार्यालयात हजर होत असल्याचा संशय व्यक्त होत होता. यामुळे कामकाजात शिस्तभंग, कुचराई व शैक्षणिक कामकाजात…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथील सरकारी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय!

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या विकसित भारत या धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी दवाखान्यांना सेवा सुविधा उत्तम पुरविण्यात आलेल्या आहेत. परंतु परंडा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय नेहमी रुग्णांच्या सेवेसाठी रेफर रुग्णालय व सुविधाचाअभाव,डॉक्टरांचा अनुपस्थितीचा प्रभाव येथील दवाखान्यावर कायम राहिला आहे. त्यात या दवाखान्यामध्ये उपलब्ध असणारे कर्मचारी रुग्णांना उद्धट भाषेमध्ये बोलतात. रुग्णांची निट तपासणी न करता त्यांना भयभीत…

अधिक बातमी वाचा...

मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेशाचा निर्णय तात्काळ मागे घ्या – ओबीसी कृती समिती परंडा

परंडा(माझं गांव माझं शहर ) १ सप्टेंबर २०२५ रोजी शासनाने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती परंडा तालुक्याच्या वतीने परंडा तहसीलदार यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणास बाधा निर्माण करणाऱ्या निर्णयाबाबत ओबीसी समाज…

अधिक बातमी वाचा...

ईद ए मिलादुन्नबी निमित्त कुंभेफळ येथे जरांगे पाटील समर्थक यांचा मुस्लीम बांधवाकडून सत्कार.

परंडा (माझं गांव माझं शहर)परंडा तालुक्यात कुंभेफळ येथे ईद-ए-मिलादुश्वी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळा ते कोठुळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्या नेण्यात आली. गफूरशा बाबा यांना चादर चढवून फाटक करण्यात आली. खात्याखाली संपल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले ईद ए…

अधिक बातमी वाचा...

‘टीईटी’ अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिक्षकामध्ये खळबळ..!

परंडा, (तानाजी घोडके) अल्पसंख्याक सोडून इतर प्राथमिक व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नोकरीत असलेल्या देशभरातील शिक्षकांना टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिला आहे. या निकालामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. ज्या- त्या शिक्षकांच्या तोंडी सध्या ‘टीईटी’ चीच चर्चा आहे.मागील काही महिने शिक्षकांच्या वर्तुळात ऑनलाइन बदलीचा बोलबाला होता. काहीना जवळची शाळा…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळ (आगरकर गल्ली) येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते मा.आ. श्री.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपन्न.

माझं गांव माझं शहर:- परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळ (आगरकर गल्ली) येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे लाडके , कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गात आरक्षण देत ऐतिहासिक निर्णय घेतला. महायुती सरकारचे प्रतिनिधी या नात्याने भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे जल्लोष : महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य.

परंडा : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करून जीआर काढल्याबद्दल परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुलाल उधळून व फटाके फोडून मराठा आंदोलक व समाज बांधव यांनी आनंदोत्सव , जल्लोष साजरा केला .     

अधिक बातमी वाचा...

परंडा -शहरातील एकमेव ट्रस्टी जय भवानी गणेश मंडळाची १९८२-८३ मधील श्री मुर्ती आजही कायम आहे.

परंडा, ता. २ ( तानाजी घोडके ) शहरातील एकमेव रजि. ट्रस्टी १९८० स्थापना असलेल्या जय भवानी गणेश मंडळाने ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देत समाजप्रबोधनपर उपक्रम हाती घेतले आहेत. दरवर्षी गणेश जयंतीला रक्तदान शिबिरही घेतले जाते. मिरवणुकीत लेझीम पथकासह, हलगी, टाळ पथक अशा पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीची प्रथा आजही कायम…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशन येथे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची व्याप्ती व कार्य याबाबत काशीद यांनी सखोल माहिती सागितली पत्रकारा सोबत चर्चा , संवाद करण्यात आली. पत्रकारांच्या सोबत आम्ही नेहमी तत्पर राहू व न्याय देण्यासाठी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!