परंडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने नियोजित बैठकीला उपस्थित राहणे बाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आव्हान केले आहे
मा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह करमाळा रोड परंडा येथे मतदान प्रतिनिधी /मतमोजणी प्रतिनिधी/ निवडणूक प्रतिनिधी यांचे नेमणूक करिता माहिती देण्यासाठी बैठक आयोजित केले आहे.
त्यानुसार आपण किंवा आपले प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे अशी आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी परंडा यांनी केले आहे.