परंडा (प्रतिनिधी परंडा तालुक्यातील आसु येथे एकाच रात्री पांच जणांची घरे फोडून ८८ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना नुकतीचघडली आहे या घटनेनंतर सर्वत्र घबराटीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
या संबंधी मिळालेली माहिती अशी की धनाजी यादव यांच्या घरांची कडी कोयडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरात ठेवलेले १०००० हजार रुपये घेऊन गेले तसेच त्यांच्या शेजारी असलेले सोमनाथ जाधव व कुसुम जाधव यांच्या कडील ५१००० हजार रुपये चे दागिने तर बुरंगे यांच्या घरातून ६५०० रुपये तर बजरंग जाधव यांच्या घरातून तीन साड्या असा एकुण ८८५०० रुपये ची चोरी एकाच रात्री झाल्या आहेत या बाबतची फिर्याद धनाजी यादव यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली आहे
गेल्या अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यात चोरी च्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सध्या तर गणपती महोत्सवाच्या काळात तर रात्रंदिवस पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरी होत आहेत तेव्हा रात्रीच्या वेळी बंदोबस्तात वाढ करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.