परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे विश्वासू मानले जाणारे भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांचा आज 12 सोनारी येथे जनता दरबार होत आहे या जनता दरबारामध्ये तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सुजितसिंह ठाकूर हे प्रयत्न करणार आहेत.
यामध्ये शेती, महावितरण, कृषी, तहसील महसूल, अशा विविध शासकीय कार्यालयातील कामाचा पाठपुरावा व नागरिकांना होणारा त्रासाला कमी करण्यासाठी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे आज सोनारी येथील जनता दरबारामधून कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
त्यामुळे सोनारी सर्कलमधील सर्व ग्रामस्थ नागरिक गावकरी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद बाप्पा रगडे यांनी केले आहे.