धाराशिव(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे पवनचक्की कंपनीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वाशी, भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचे अमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रदेश महामंत्री सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी (दि.३०) जुलै रोजी उपोषणस्थळी भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर ठाकूर यांनी शेतकऱ्यासोबत चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्याची बैठक घेतली. बैठकीत शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मावेजा देण्यात यावा तसेच शेतकऱ्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, अश्या सूचना यावेळी सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी दिल्या.
याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, शेतकरी संघर्ष समितीचे गणेश चौधरी, सुजित मोरे, मदुकांत चौधरी, रमेश गाढवे, सुरेश (बाप्पा) कवडे, राजगुरू (महाराज) कुकडे, प्रदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर घोलप, वाशी, भूम, कळंब तालुक्यातील शेकडो शेतकरी, सेरिंटिका कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.