भैरवनाथ शुगरचे मोळीपूजन ; चेअरमन अनिल सावंत व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या हस्ते संपन्न..!

परंडा (प्रतिनिधी) सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याचा १८ व्या गणित हंगामाचा मुळी पूजन कार्यक्रम चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाला जास्तीचा भाव जाहीर करून आमदार डॉ तानाजीराव सावंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरतील अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली.

भैरवनाथ साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादकांच्या पाठीशी कायम राहिलेला आहे. कारखानाच्या १८ व्या गळीत हंगामाला प्रारंभ झालेला आहे. कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा असून कारखाना गाळापासाठी सज्ज झाला आहे. आमदार तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना जास्तीचा भाव मिळणार आहे. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन चेअरमन सावंत यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, भूम शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, पंचायत समितीचे माजी सभापती सतीश दैन, प्रगतशील शेतकरी गजेंद्र सूर्यवंशी, अॅड रणजीत खरसडे, ह.भ.प नागेश महाराज मांजरे, शिवाजी सूर्यवंशी, राहुल बापूसाहेब देशमुख, कार्यालय अध्यक्ष सोमनाथ पाटील, बप्पा लांडगे, सुधीर देशमुख, संतोष सूर्यवंशी, महादेव मुळीक, सुरक्षा अधिकारी भुजे, प्रकाश गाढवे, कल्याण शिंदे, सचिन जेजेराम सूर्यवंशी, हेड टाईम कीपर सुरेश साळुंके, सोनारीकर, धोंडीराम फुले, औदुंबर गाडे, जनरल आबा अनवणे, भैरू गरदाडे यांच्यासह मोठ्या मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, बिसलरी मॅनेजर अजित संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक भोसले, चीफ केमिस्ट दादासाहेब बोरकर, चीफ ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी इंजिनियर रविकांत सिंग, भोजन मॅनेजर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे खुमासदार उदयशंकर गडगे, चीफ अकाउंटंट गोविंद सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कारखान्याचे कुलकर्णी, शेती अधिकारी भगवान काळे, ईडीपी मॅनेजर सुभाष भोसले यांनी केले.

error: Content is protected !!