परंडा, दि.८(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे सन २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण झालेली विद्यालयाची गुणवान विद्यार्थिनी कु. शुभांगी सुग्रीव पाटील (सोनगिरी) हिचा सुप्रसिद्ध एल अँड टी (Larsen & Toubro)कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. सत्कार पूजा रोडगे मॅडम यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे , सर्व शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी शुभांगीचे अभिनंदन करताना सांगितले की, “अतिशय साध्या परिस्थितीत, वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने मुलांना शिक्षणासाठी प्रेरणा देत धैर्याने उभं राहत मार्गदर्शन केले. त्या प्रेरणेमुळे शुभांगीने आज एल अँड टी सारख्या नामांकित कंपनीत स्थान मिळवून परंडा तालुक्याचा मान उंचावला आहे.”
सत्कार कार्यक्रमात शुभांगीने विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, समर्थ शैक्षणिक वातावरण आणि आईच्या अथक प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शुभांगीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.