बावची विद्यालय परंडा येथे; प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

परंडा :(प्रतिनिधी) बावची विद्यालय परंडा, वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा व राजे शिवाजी पब्लिक स्कूल परंडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन श्री बिभीषण रोडगे सर( संस्थापक अध्यक्ष श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ,बावची) यांच्या शुभहस्ते पार पडले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक परंडा, ऐश्वर्या वडगावे कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग परंडा, अनिता रोडगे माजी मुख्याध्यापक बावची विद्यालय, परंडा, गेनभाऊ बारस्कर, बालाजी बारस्कर, कुलदीप कदम, ऍड आजम पठाण, व बावची विद्यालयाचे प्राचार्य श्री नारायण खैरे सर उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व, निबंध, सामान्यज्ञान, सुंदर हस्ताक्षर व चित्रकला आदी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या व पालकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये बावची विद्यालयातील समर्थ दोरगे, श्रद्धा माळी, जिया पठाण, तेजस नाईक, शिवानी लिमकर, नंदिनी मोरे, श्रुतिका लटके, आरोही भांडवलकर, स्वरा रेडे, राजनंदिनी भांडवलकर, गौरी गायकवाड, सानवी नवले, श्रेया सूर्यवंशी, संग्राम तिंबोळे, संस्कृती देवकर, तेजस मोरे, सुप्रिया तांबोळी, प्रणव कोकाटे, गायत्री कोरे, कार्तिकी लटके, आलिया पठाण, श्रावणी बारस्कर, जानवी सूर्यवंशी, प्रणिता जगताप, राजकन्या चव्हाण, महेश गणगे, सृष्टी काठवडे, राजनंदिनी चोपडे, पूर्वी लांडगे, जारा शेख, सिद्धी गरड, दीक्षा गोफने, सृष्टी लिमकर, अंकिता करळे आदी विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले.

या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

error: Content is protected !!