बार्शी (माझं गांव माझं शहर ) कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी संचालक मंडळ निवडणूक २०२५–२६ ते २०३०–३१ या कालावधीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण ११९ अर्ज दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार सहकारी संस्था सर्वसाधारण गटात ५५ अर्ज, सहकारी संस्था महिला राखीव गटात ८ अर्ज, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गटात ६ अर्ज, सहकारी संस्था विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात ८ अर्ज, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात १२ अर्ज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती / जमाती गटात ६ अर्ज, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक गटात ६ अर्ज, व्यापारी प्रतिनिधी गटात ८ अर्ज, तसेच हमाल-तोलार मतदार संघातून ८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
एकूण १२३ अर्जांपैकी ४ अर्ज दुप्पट असल्याने अंतिम आकडा ११९ अर्जांचा ठरला आहे.
अर्जांची छाननी १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. वैध अर्जांची यादी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बाजार समितीच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. अर्ज माघारी घेण्यासाठी ११ ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मुदत दिली आहे.उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. मतदान ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत होणार असून, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडावी यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.