पुणे येथील अविनाश वाघमारे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना १४००० रु.पाठ्यपुस्तके वाटप.

परंडा(प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथील एकूण 18 गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश वाघमारे यांनी आर्थिक अडचणीमुळे पाठ्यपुस्तक घेऊ न शकणार्‍या दोन्ही प्रशालेच्या एकूण 18 मुलां मुलींना 14 हजार रुपये किमतीची इयत्ता 9 वी व 10 ची पाठय़पुस्तक संच वाटप केले. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासनाकडून मोफत पाठय़पुस्तके दिली जातात परंतु 9 वी 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतः पाठ्यपुस्तक घ्यावी लागतात.
समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लागावा म्हणून प्राध्यापक अविनाश वाघमारे दरवर्षी दोन्ही प्रशालेच्या होतकरू मुलांना मदत करत आहेत प्राध्यापक अविनाश वाघमारे हे परंडा येथील रहिवासी असून जिल्हा परिषद प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत.पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमासाठी त्यांच्या आई सौ. कमल विश्वनाथ वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले यावेळी मुलांच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र इंगळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दिनकर पवार, माध्यमिक शिक्षक श्री सतीश खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शुभांगी देशमुख साबिया तांबोळी मीनाक्षी मुंढे यांच्यासह दोन्ही प्रशालेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाघमारे कुटुंबाचे दोन्ही प्रशालेच्या पालक विद्यार्थी शिक्षक यांनी आभार व्यक्त केले आहेत त्यांच्या या उपक्रमाची समाजातील सर्व स्तरामधून प्रशंसा होत आहे.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन आबासाहेब माळी तसेच आभार प्रदर्शन नामदेव पखाले यांनी केले.

Leave a Reply

error: Content is protected !!