परंडा(प्रतिनिधी) शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयाचा वाणिज्य विभागाचा माजी विद्यार्थी अविनाश विधाते यांनी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्याचा श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाविद्यालयामध्ये सत्कार केला. याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ सचिन साबळे डॉ संतोष काळे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अध्यक्ष श्रीमती पद्मा शिंदे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने तसेच कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी संजय निंबाळकर यांनी माजी विद्यार्थी या नात्याने अविनाश विधाते यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते