myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

अमोसॉफ्ट टेककवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीने नॅशनल लेवल प्रेसेंटेशन प्रोग्राम संपन्न.

पुणे (माझं गांव माझं शहर) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमोसॉफ्ट टेककवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीने नॅशनल लेवल प्रेसेंटेशन प्रोग्राम चे आयोजन केले होते. या मध्ये धाराशिव व सोलापूर येथील इंद्रा पोलिटेक्निक इंजिनीरिंग विद्यार्थी व विध्यार्थिनींनी सहभाग नोंदवीला होता. याचा बक्षीस वितरण सोहळा 23 ऑगस्ट रोजी पुणे येथील पवना लेक, लोणावळा येथे संपन्न करण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या विरोधात पत्रकार एकवटले

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर तुळजापूर येथील ड्रग प्रकरण आदींसह विविध मुद्द्याबाबत पत्रकारांनी वास्तव मांडल्यामुळे पत्रकारांना टार्गेट करीत बघून घेईन, आमच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यानंतर पत्रकारांचे काय होईल ? यासह इतर प्रकारच्या धमक्या देण्याचे प्रकार हल्ली वाढलेले आहेत. त्यामुळे पत्रकारांना धमकावणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी,…

अधिक बातमी वाचा...

डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिचा मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते  सत्कार..

परंडा(माझं गांव माझं शहर) तुळजापूर येथील भाजपा मा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा जैन प्रकोषठचे मा. सहसंयोजक श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे यांची कन्या डॉ. कु. अंकिता व्यवहारे ही वैद्यकीय शिक्षण (MBBS) जार्जिया येथे पूर्ण करून भारतातील एफएमजीई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. आज डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिने परंडा येथे ‘संवाद’ निवासस्थानी भाजपा नेते मा. आ. श्री….

अधिक बातमी वाचा...

घाबरू नका मी तुमच्यासोबत!; कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांचा संदेश.

पुणे (माझं गांव माझं शहर)  कोथरूड प्रकरणातील तीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अन्यायकारकपणे खोटे गुन्हे दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर आज, दिनांक २३ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भेट घेतली.पोलिसांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सागर नामदेव…

अधिक बातमी वाचा...

पुण्यातील किक्की पबवर मनसे विद्यार्थी सेनेची धडक कारवाई..!

पुणे(माझं गांव माझं शहर)पुण्यातील किक्की पब अँड बार येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष श्री. धनंजय भाऊ दळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे विद्यार्थी सेनेने धडक रेड टाकली. या पबमध्ये फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली १७ ते २१ वयोगटातील नामांकित कॉलेजमधील मुला-मुलींना सरसकट दारू व अन्य नशेच्या वस्तू पुरवल्या जात असल्याचे उघड झाले. मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही…

अधिक बातमी वाचा...

कुर्डूवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा

कुर्डुवाडी(माझं गांव माझं शहर) राज्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवा, त्यांनी समाधानकारक जागा दिल्या नाही तर इतर पक्षाशी युती करा. मात्र राष्ट्रवादी शरद पवार व ‘उबाठा’ सेनेच्या नादी लागू नका, प्रसंगी स्वतंत्र लढा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाई…

अधिक बातमी वाचा...

सिना कोळेगाव धरणाचे ४ दरवाजे उघडले :  १ हजार २६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

परंडा(माझं गांव माझं शहर) : तालुक्यातील डोमगांव येथील सिना कोळेगाव धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याने शनिवारी सकाळी ७:०० वाजता ४ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे आता धरणाच्या एकूण २१ वक्र दरवाजांपैकी एकूण चार दरवाजातून पाणी विसर्ग सुरु झाला आहे. या चार दरवजांतून १ हजार २६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सिनापात्रात सुरु करण्यात आला…

अधिक बातमी वाचा...

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या अनुषगांने परंडा पोलिसांच्या वतीने शांतता समिती बैठक , शहरात रूट मार्च.

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरात आगामी काळात होणारे सन उस्तवा निमित मा.पोलीस अधिक्षक धाराशिव शफकत आमना, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांचे उपस्थितीत दिनांक २३.०८.२०२५ रोजी पोलीस ठाणे परंडा येथे गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या अनुषगांने शांतता समिती बैठक, पोलस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांचे बैठकीचे आयोजन करण्यात…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची निवड

पुणे(माझं गांव माझं शहर)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे शहर युवा सहसचिव पदी शुभम मुळे यांची नुकतीच निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे येथील राज्यस्तरीय राजकुमार काळभोर स्मृती राज्यस्तरीय कवी व साहित्य संमेलनात या निवडीबद्दल दिनांक. १९ ऑगस्ट रोजी महात्मा जोतिबा फुले सभागृहात शुभम मुळे यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात संमेलन अध्यक्ष,…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कुल शाळेची विद्यार्थीनी हिरकणी शिंदे हिचे बुद्धीबळ स्पर्धेत यश .

अनाळा (माझं गांव माझं शहर ) परंडा तालुक्यातील अनाळा येथीलन्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थीनी हिरकणी हनुमंत शिंदे हिने दि. २२ रोजी खंडेश्वर विदयालय , कात्राबाद येथे झालेल्या तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात उत्कृष्ट यश संपादन केल्याने तिची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जय जवान जय किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव लक्ष्मणराव वारे…

अधिक बातमी वाचा...

परंडा:- बैलपोळा सणानिमित्त ढोल ताशाच्या गजरात सजावट केलेल्या बैलांची मिरवणुक..!

परंडा (तानाजी घोडके ) लाडक्या सर्जा-राजासाठी महत्वाचा असणारा बैलपोळा सण पारंपारिक प्रथेनुसार,शुक्रवार दि..२२ रोजी ऊत्साहात साजरा करण्यात आला.बैलांची आकर्षक सजावट करुन वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती.घरलक्ष्मी महिलांनी विधिवत पुजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला. आपल्या लाडक्या बैलांना सोबती घेऊन शेतकरी शेतीतुन चांगले उत्पन्न घेण्यासाठी काबाडकष्ट करतो.माञ,निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे अर्थकारण बिगडुन शेती…

अधिक बातमी वाचा...

केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदासजी आठवले यांचे परंडा येथे भाजपाच्या वतीने स्वागत..!

परंडा(माझं गांव माझं शहर):- रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आ.) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदासजी आठवले यांचे परंडा येथे भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंद बप्पा रगडे, शहराध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. श्री. जहीर चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. अविनाश विधाते व युवा नेते श्री. समरजीतसिंह ठाकूर,…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!