myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

पुणे येथील अविनाश वाघमारे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना १४००० रु.पाठ्यपुस्तके वाटप.

परंडा(प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथील एकूण 18 गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश वाघमारे यांनी आर्थिक अडचणीमुळे पाठ्यपुस्तक घेऊ न शकणार्‍या दोन्ही प्रशालेच्या एकूण 18 मुलां मुलींना 14 हजार रुपये किमतीची इयत्ता 9 वी व 10 ची पाठय़पुस्तक संच वाटप केले. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना…

अधिक बातमी वाचा...

राज्यातीन विना अनुदानित शाळा ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद..!

परंडा : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. ५ जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षक पदवीधर आमदारांच्या शिष्टमंडळास लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही या आंदोलनास पाठबळ देण्यासाठी दि.८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक-कार्यकारी अभियंता

परंडा, दि. १- परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक आढळून आल्या आहेत. अशा सर्व वर्गखोल्या तत्काळ पाडण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि शिक्षणाधिकारी यांनी युक्तरीत्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.तालुक्यातील नालगाव, जामगाव, भांडगाव, देऊळगाव, सावदरवाडी, पिंपळवाडी, डोंजा, घारगाव, कांदलगाव, ब्रह्मगाव या गावातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. या खोल्यांचे बांधकाम झिजल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

श्री क्षेत्र भगवान बाबा दिंडीचे कुंभेफळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले..

परंडा(प्रतिनिधी) संत भगवान बाबा महाराज पालखी मधील वारकरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आषाडी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गड येथुन विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूर कडे निघालेल्या श्री क्षेत्र भगवान बाबा गड दिंडीचे कुभेफळ येथे , दि.30 जून सोमवार रोजी सयाकाळी पाच वाजता आगमण होताच दिंडीचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. कुभेकळ येथे…

अधिक बातमी वाचा...

प्रा डॉ शहाजी चंदनशिवे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

परंडा(प्रतिनिधी) श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांना रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी शिर्डी येथे बी दी चेंज फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे . त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेत या सामाजिक संस्थेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श…

अधिक बातमी वाचा...

भूम तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहुल भैय्या मोटेंच्या नेतृत्वात १५ उमेदवार बिनविरोध.

भूम(प्रतिनिधी) कै. आमदार महारुद्र बप्पा मोटे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने शिवाजी खरेदी-विक्री संघ भूमच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2025 ते 2030) एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या नियोजनातून आणि नेतृत्वाखाली | १५ पैकी १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे…

अधिक बातमी वाचा...

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

कळंब(प्रतिनिधी) पत्रकारांच्या कल्याणासाठी झगडत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्कार समारंभात पत्रकारांच्या पाल्यांना एकुण ३० कीटचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय पाटील दुधगावकर जि प माजी अध्यक्ष धाराशिव, हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पवार पोलीस उपविभागीय अधिकारी…

अधिक बातमी वाचा...

श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केले स्वागत

परंडा(तानाजी घोडके) भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे अतिशय सुंदर भक्तीमय वातावरणात परंडा येथे स्वागत केले. भगवान गड येथील श्री क्षेत्र भगवानबाबा दिंडीचे आगमन कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडा येथे मोठ्या उत्साहात दाखल झाली. भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून सर्व वारकरी यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी…

अधिक बातमी वाचा...

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच उदंचन जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होणार

मुंबई(प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर’ यांच्यामध्ये तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून, येत्या काळात अपारंपारिक…

अधिक बातमी वाचा...

परंडा: पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची केली सुटका.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या ३० गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. यामध्ये ४ जर्सी गायी आणि २६ वासरांचा समावेश असून, त्यांची किंमत सुमारे २,३०,००० रुपये आहे. ही घटना जवळा (नि.) परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली, ज्यामुळे स्थानिक जनतेमध्ये चिंता आणि संताप व्याप्त झाला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि….

अधिक बातमी वाचा...

परंडा पालखी सोहळ्याचे महत्त्व: २० हजार वारकऱ्यांचे एकत्र आगमन

परंडा(तानाजी घोडके) पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (दि.२९) सायं. ६ वाजता परंडा येथे आगमन होताच परंडा वासियांनी भव्य स्वागत केले. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, वातावरणात आनंद आणि भक्तीचा उत्साह पसरला. श्रींची पालखी येणार असल्याने पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, ज्यामुळे धार्मिक उत्सवाची…

अधिक बातमी वाचा...

ज्ञानेश्वर जाधव यांनी: दारूच्या नशेत पोटच्या मुलीची केली निर्गुण हत्या .

परंडा (शेळगांव ) दारूच्या नशेत एका पित्याने आपल्याच नव वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. ही हृदय पिळऊन टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उढाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचे नाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!